१०. डोळ्यात अश्रू नसणे, हृदय कठोर असणे, विनाकारण मोठ्या अपेक्षा ठेवणे आणि जगाबद्दल अति हवस व लालसा ठेवणे या चार गोष्टी दुर्भाग्याची चिन्हे आहेत. [अल्लाह चे अंतिम पैगंबर मुहम्मद ﷺ]
१४. जो व्यक्ती तुमच्यासोबत विश्वासघात करतो तुम्ही त्याच्यासोबत विश्वासघात करू नका. अर्थातच अल्लाह ला विश्वासघाती लोक अजिबात आवडत नाही. [अल्लाह चे अंतिम पैगंबर मुहम्मद ﷺ]
१५. ज्या व्यक्तीकडे या चार गोष्टी आहेत त्यास जगातील इतर एखादी वस्तू नसल्याचा खेद नाही राहणार: १. ठेवीचे रक्षण, २. प्रत्येक बाबतीत सत्यता, ३. चांगली सवय, आणि ४. पवित्र उत्पन्न. [अल्लाह चे अंतिम पैगंबर मुहम्मद ﷺ]
२२. आपली मुलं आणि नातेवाईक बद्दल रागाच्या भरात श्रापाची मागणी कदापि करू नका. कारण जर त्यावेळी प्रार्थना पूर्ण होण्याची वेळ असेल तर आपली मागणी मान्य. होईल नंतर तुमच्यावर पश्चाताप करण्याची वेळ येईल. [अल्लाह चे अंतिम पैगंबर मुहम्मद ﷺ]